मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कृषी विधेयकासह फोन टॅपिंगचा मुद्दाही चांगलाच गाजला असल्याचे पाहायला मिळाले आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. 2016-17 मध्ये माझा फोन टॅप करण्यात आला होता, आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे.
माझा फोन नंबर अमजद खान नावाने टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली. माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचंह नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
यावेळी नाना पाटोळे बोलताना म्हणाले कि, ‘पुणे पोलीस कमिशनरच्या माध्यमातून हे फोन टॅपिंग करण्यात आले. फोन टॅपिंग करण्याची गरज काय? या मागे कोण आहे? हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशाने झालेत? असा प्रश्न नाना पटोलेंनी उपस्थित केला. नंबर टॅप करण्यासाठी मुस्लिम लोकांची नावे का टाकली. या पद्धतीने हिंदू मुस्लिमामध्ये वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने पुन्हा राजकारण करून राज्य पेटवण्याचा उद्देश या मागे होता का? फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा. या प्रकरणाची सविस्तर माहिती गृहमंत्र्यांनी आजच्या आज द्यावी.’ अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- राजभवनात दोन मोरांमध्ये जुंपली अन् नेटकऱ्यांना अधिवेशनच आठवलं !
- ‘देवेंद्र फडणवीसांचा डोळा मारणे सर्व काही सांगून जाते’; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप
- सेनेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी नारायण राणेंना दिले जाणार मंत्रिपद ?
- ‘१२ आमदारांच्या निलंबनाविरोधात हायकोर्टात जाणार’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची माहिती
- अत्याधिक आक्रमकता भाजपला नडली; १२ आमदारांच्या निलंबनाचा भविष्यात बसू शकतो फटका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

