Share

‘देवेंद्र फडणवीसांचा डोळा मारणे सर्व काही सांगून जाते’; सचिन सावंत यांचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : कालपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाचा कालचा दिवस खूप वादळी ठरला. कालच्या अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली होती.

निलंबन झालेल्या १२ आमदारांनी राजभवन गाठत कारवाईविरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी या कारवाईचा अहवाल मागवावा, यासोबतच सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ताब्यात घ्यावी अशी मागणी भाजप आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केली होती. तर, अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधकांचा गोंधळ कायम असून भाजपने सभागृहाबाहेर अभिरूप विधानसभा भरवली होती. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला होता.

दरम्यान, भाजपने विधीमंडळाच्या आवारात माईक आणि स्पीकरचा वापर या अभिरूप विधानसभेत भाजपने केला होता. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी मार्शल ना माईक आणि स्पीकर जप्त करण्यात सांगितले. यानंतर, भाजप नेते अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाष्य करत टीकास्त्र सोडलं आहे.

‘भाजपाचे विरोधीपक्ष म्हणून वर्तन अत्यंत हिडीस आहे. काल खुलेआम धमक्या, शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. आज विधिमंडळाच्या आवारात माईक आणि स्पीकरचा वापर ते कसा करु शकतात? संविधानिक जबाबदारी व लोकशाही मूल्यांचा हा पूर्णपणे अनादर आहे. देवेंद्र फडणवीसजींचे डोळा मारणे सर्व काही सांगून जाते!,’ अशी टीका सचिन सावंत यांनी ट्विटद्वारे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!