🕒 1 min read
मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली. मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांवर आता चर्चा नको तर हे काळे कायदे थेट रद्द करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.
या आंदोलनाला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यासाठी, काहींनी दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल,” अशी मागणी केली आहे. मेधा पाटकर यांच्या याच भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळखर यांनी ट्विट करत संतापजनक वक्तव्य केलं आहे.
‘ही दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवले आहे, ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी’. असे संतापजनक वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे.
कृषी कायद्यावर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लागेल- मेधा पाटकर…
ही दमबाजी कुणाला करताय?
देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवले आहे, ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी. pic.twitter.com/rbjV72K8M5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 9, 2020
यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी अतुल भातखळकर यांना चांगलच झापलं आहे. अतुल भातखळकर यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. देशातील 121 कोटी जनतेला जर भातखळकर सुपारी बाज म्हणत असतील, तर ही जनता 2024 मध्ये भाजपा नेत्यांना सुपारी फोडायला घरी बसवेल.अस भूषण राऊतम्हणाले आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या रेखा फड यांनी देखील अतुल भातखळकर यांना चांगलच फैलावर घेतला आहे. ‘भातखळकर साहेब, काय खोट बोलल्या मेधाताई गेली पंधरा दिवस उलटले देशातला शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीत रस्त्यावर आहे. तरीही मोदी सरकार कृषी विरोधी कायद्यावर चर्चा करू शकतं नसेल तर याला काय म्हणायचे ? असा टोला रेखा फड यांनी लगावला आहे.
@BhatkhalkarA साहेब, काय खोट बोलल्या मेधाताई गेली पंधरा दिवस उलटले देशातला शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीत रस्त्यावर आहे. तरीही मोदी सरकार कृषी विरोधी कायद्यावर चर्चा करू शकतं नसेल तर याला काय म्हणायचे ?? पण हो आम्ही मात्र कृषी विधेयक मंजूर करण्यासhttps://t.co/JZbgEaoXp3
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) December 10, 2020
@PMOIndia सरकारला भाग पाडू हा धमकी वजा इशारा समजा.. सुपारीबाज कोणाला म्हणता हो ?? तुमच्या एका-एका मंत्र्यांचे काळे धंदे, घोटाळे जर आम्ही बाहेर काढले तर तुम्ही कुठलेच राहणार नाहीत. आज ज्या जगाच्या पोशिंद्या सोबत तुम्ही निच खेळ मांडलाय ना.. तो हाच बळीराजा मोदी सरकारला घरी
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) December 10, 2020
पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही लक्षात ठेवा… @LoksattaLive @TV9Marathi @News18lokmat @abpmajhatv @zee24taasnews @DaradeAbhi @SarkarnamaNews @thodkyaat @IndiaToday @timesofindia @ANI @JaiMaharashtraN @MiLOKMAT @bbcnewsmarathi @aajtak
— Rekha Phad (@RekhaPhadSpeaks) December 10, 2020
तर, आम्ही मात्र कृषी विधेयक मंजूर करण्यास सरकारला भाग पाडू हा धमकी वजा इशारा समजा. सुपारीबाज कोणाला म्हणता हो ? तुमच्या एका-एका मंत्र्यांचे काळे धंदे, घोटाळे जर आम्ही बाहेर काढले तर तुम्ही कुठलेच राहणार नाहीत. आज ज्या जगाच्या पोशिंद्या सोबत तुम्ही निच खेळ मांडलाय ना.. तो हाच बळीराजा मोदी सरकारला घरी पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही लक्षात ठेवा. असा इशारा देखील फड यांनी भातखळखरांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील असंतोष विझविण्याऐवजी तो भडकलेला ठेवण्यात सरकारला रस आहे : शिवसेना
- तृप्ती देसाईंना शिर्डीमध्ये प्रवेशबंदी! शिर्डी पोलीसांनी तृप्ती देसाईंना दिली नोटीस
- मराठा आरक्षण : सरकार मराठा समाजाची थट्टा करत आहे : समरजितसिंह घाटगे
- शेतकऱ्यांनाच देशद्रोही ठरवण्याचे कारस्थान दानवे रचत आहेत; आम आदमी पक्षाचा हल्लाबोल
- पारनेर नगरपंचायतीवर भगवा फडकवणार, शिवसैनिकांनी केला निर्धार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
