Share

‘मेधा पाटकरांना सुपारीबाज म्हणणारे भातखळकर हे लाचार नेते’, युवक कॉग्रेसचा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. शेतकऱ्यांच्या भारत बंदला मिळालेला पाठींबा पाहता सरकारने नमतं घेत एक दिवसा आधीच म्हणजेच 8 डिसेंबरलाच घेतली. मात्र ही बैठक सुद्धा निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. नव्या कृषी कायद्यांवर आता चर्चा नको तर हे काळे कायदे थेट रद्द करा अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.

या आंदोलनाला महाराष्ट्रातील राजकीय पक्ष तसेच इतर सामाजिक कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दर्शवला. त्यासाठी, काहींनी दिल्लीला जाऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलंय. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनीही कृषी कायद्यांना विरोध करत “कृषी कायद्यांवर चर्चा होऊच शकत नाही, तो मागेच घ्यावा लगेल,” अशी मागणी केली आहे. मेधा पाटकर यांच्या याच भूमिकेवर भाजपचे आमदार अतुल भातखळखर यांनी ट्विट करत संतापजनक वक्तव्य केलं आहे.

‘ही दमबाजी कुणाला करताय? देशाच्या जनतेने घसघशीत मतदान करून मोदींना पंतप्रधान बनवले आहे, ते तुमच्या सारख्या सुपारीबाज आंदोलकांना भीक घालणार नाहीत. तुमची दमबाजी मोडूनच काढायला हवी’. असे संतापजनक वक्तव्य अतुल भातखळकर यांनी केले आहे.

 

यावर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष कपिल ढोके यांनी भातखळकर यांचा खरपूस समाचार घेतला आहे. भातखळकर हे लाचार नेते आहेत. केवळ पक्ष नेतृत्वाला खुश करण्यासाठी करण्यासाठी त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना सुपारी बाज म्हटले आहे. किमान रोज खात असलेल्या भाकरी सोबत तरी भातखळकरांनी प्रामाणिक राहायला हवे. केवळ पक्ष नेतृत्वाला खुश करण्यासाठी, खात असलेल्या भाकरी सोबत तरी बेईमानी करू नका असा सल्ला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते कपिल ढोके यांनी दिला.

तर यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी देखील अतुल भातखळकर यांना चांगलच झापलं आहे. अतुल भातखळकर यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. देशातील 121 कोटी जनतेला जर भातखळकर सुपारी बाज म्हणत असतील, तर ही जनता 2024 मध्ये भाजपा नेत्यांना सुपारी फोडायला घरी बसवेल.अस भूषण राऊतम्हणाले आहेत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या नेत्या रेखा फड यांनी अतुल भातखळकर यांना चांगलच फैलावर घेतला आहे. ‘भातखळकर साहेब, काय खोट बोलल्या मेधाताई गेली पंधरा दिवस उलटले देशातला शेतकरी एवढ्या कडाक्याच्या थंडीत दिल्लीत रस्त्यावर आहे. तरीही मोदी सरकार कृषी विरोधी कायद्यावर चर्चा करू शकतं नसेल तर याला काय म्हणायचे ? असा टोला रेखा फड यांनी लगावला आहे.

तर, आम्ही मात्र कृषी विधेयक मंजूर करण्यास सरकारला भाग पाडू हा धमकी वजा इशारा समजा. सुपारीबाज कोणाला म्हणता हो ? तुमच्या एका-एका मंत्र्यांचे काळे धंदे, घोटाळे जर आम्ही बाहेर काढले तर तुम्ही कुठलेच राहणार नाहीत. आज ज्या जगाच्या पोशिंद्या सोबत तुम्ही निच खेळ मांडलाय ना.. तो हाच बळीराजा मोदी सरकारला घरी पाठवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही लक्षात ठेवा. असा इशारा देखील फड यांनी भातखळखरांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!