Share

ऑक्सिजन तुटवडा कमी करण्यासाठी गडकरींप्रमाणे इतर नेत्यांनी पुढाकार घ्यावा – अजित पवार

Published On: 

पुणे : राज्यासह देशभरात कोरोनाचा हाहाकार पुन्हा एकदा वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून राज्य सरकारने स्वतः ऑक्सिजन निर्मितीची वाढ करण्यासह केंद्राकडे मदत मागितली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्याची आढावा बैठक घेतली.

या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ऑक्सिजन तुटवड्याबाबत भाष्य करताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींप्रमाणे इतर नेत्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं आहे. ‘ऑक्सिजन तुटवड्याबाबत नितीन गडकरींशी बोलणं झालं. त्यांनी विदर्भाच्या ऑक्सिजनची पूर्ण जबाबदारी घेतो असं सांगितलं. यामुळे राज्य सरकारवरील ताण कमी होणार आहे. अशा प्रकारे राज्यातील विविध नेत्यांनी इतर भागांची जबाबदारी घेतल्यास ऑक्सिजनचा तुटवडा लवकरात लवकर आटोक्यात आणता येईल,’ असं भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.

नितीन गडकरींचा ऑक्सिजन तुटवडा मिटवण्यासाठी पुढाकार –

महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज आहे. अशातच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशाखापट्टणम येथील आयआयएनएल प्राणवायू निर्मिती प्रकल्पातून ९७ मेट्रिक टन द्रव्य (लिक्विड) प्राणवायू महाराष्ट्राला मिळणार आहे. याचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!