Share

पीपीई कीट घालत कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी करणाऱ्या खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण संख्येत होत असलेली प्रचंड वाढ आणि कमी पडत असलेली आरोग्य यंत्रणा, या सर्वात नेते मंडळी आप-आपल्या जिल्ह्यात आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यातच गेल्या दोन आठवड्यात बीडच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी कोव्हीड हॉस्पिटलची पाहणी केली होती. आरोग्य सुविधांचा आढावा घेत त्यांनी अनेक सूचनाही जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. स्वत: डॉक्टर असलेल्या खासदार मुंडे यांनी पीपीई कीट घालत कोरोना रुग्णांशीही संवाद साधला होता. मात्र, आता खासदार मुंडे यांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.

या संदर्भातली माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे. या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी आरटीपीसीआर निगेटीव्ह आली असल्याचेही सांगितले आहे. मात्र, लक्षणे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण उपचार सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर मतदार संघातील मतदारांची कामे भाजप पदाधिकारी आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून सुरूच राहतील, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

पीपीई कीट घालत खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी कोव्हीड हॉस्पिटलमधील भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याच वेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांना केले होते. मात्र, कितीही काळजी घेतली तरी खासदार मुंडे यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. टेस्ट निगेटीव्ह आली तरी लक्षणे असल्यास काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!