पुणे : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षात बसावं लागलेल्या भाजपने हे सरकार कोसळेल असं वारंवार भाकीत केलं होतं. तर, गेल्या काही महिन्यांमध्ये महाविकास आघाडीतील मंत्र्यांसह नेत्यांवर गंभीर आरोप होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर करण्याचे षडयंत्र असल्याचं मविआ नेते म्हणत आहेत.
अशातच, १०० कोटींच्या खंडणीचा आरोप मुंबईचे माजी आयुक्त परमबीरसिंह यांनी केल्यानंतर आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने (CBI) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, सीबीआयच्या कारवाईवर राष्ट्रवादी, शिवसेनेचे नेते टीका करू लागले आहेत तर भाजप नेते या कारवाईचे स्वागत करताना दिसून येत आहेत. आता, राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या विनाशाला CBI ची टोळधाडच कारणीभूत ठरणार, असं भाकीत केलं आहे.
शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून समाजामध्ये दहशत पसरवण्याचं पाप CBI च्या माध्यमातुन भाजपा करीत आहे.एखाद्या व्यक्तीला बदनाम करणे भाजपाची जुनी परंपरा आहे. अचानकपणे आणलेली CBI ची टोळधाड भाजपाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे.
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) April 24, 2021
‘शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून समाजामध्ये दहशत पसरवण्याचं पाप CBI च्या माध्यमातुन भाजपा करीत आहे.एखाद्या व्यक्तीला बदनाम करणे भाजपाची जुनी परंपरा आहे. अचानकपणे आणलेली CBI ची टोळधाड भाजपाच्या विनाशाला कारणीभूत ठरेल ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे.’ असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशातील ऑक्सिजन संकट निवारण्यासाठी हवाई दल इन ऍक्शन; सिंगापूरहून आणणार मदत
- ऑक्सिजनच्या तुटवड्याला मोदी जबाबदार, राहुल गांधींचा आरोप
- पाकिस्तानला मोफत लस देता मग देशात का नाही ? पटोलेंचा मोदींना सवाल
- ‘देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री होते, मात्र आता ते उतावीळपणा करतायत’
- कुछ कशाला ठाकरे सरकार म्हणजे शत प्रतिशत गडबड घोटाळा है; भाजपचे राऊतांना प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

