उस्मानाबाद: मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे, असाच एक अपघात अरसोली तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीवर सोमवारी सकाळी महामार्गावरून जाणारा एक ट्रक उलटला असून, त्यामुळे जलवाहिनीचे माेठे नुकसान झाले आहे. परिणाामी वाशी शहराचा पाणीपुरवठा पुढील काही दिवस विस्कळीत हाेऊ शकताे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे किती दिवसात पूर्ण होईल, याबद्दल अनिश्चितता असल्याचे नगर पंचायतच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे शहरवासीयांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
अरसोली तलावातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी १७ किलोमीटरची लोखंडी जलवाहिनी अंथरण्यात आली आहे. त्यापैकी बरीच वहिनी ही राष्ट्रीय महामार्ग सोलापूर-औरंगाबाद रोडवर आहे. सोमवारी इंदोरहून बेंगलोरच्या दिशेने निघालेला ट्रक सकाळी ७ च्या सुमारास ट्रक वाशी फाटा ते कन्हेरी पाटी दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून खाली जाऊन शेजारील वाहिनीवर जाऊन उलटला व वाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया गेले.
पालकमंत्री शंकरराव गडाख २६ जानेवारीनंतर जिल्ह्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. जिल्ह्यात कोरेानाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, तुलनेने आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनीही त्यांना टार्गेट केले होते. मात्र पालकमंत्री गडाख स्वत.: कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना दवाखान्यात भरती व्हावे लागले. रविवारी त्यांना दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

