Share

उस्मानाबाद; १७ गावांमध्ये जनता कर्फ्यू, गावांच्या सीमा पुन्हा बंद

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे शासनाने काही कडक निर्बंध लावूनही नागरिक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे तालुक्यातील ज्याठिकाणी जास्त रुग्ण आढळले आहेत, तालुक्यातील अशा १७ गावांच्या सर्व सीमा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात याव्यात, असे आदेश उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी काढले आहेत.

मागील तीन महिन्यांपूर्वी कमी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव परत मार्चपासून सुरू झाला आहे. त्यानंतर नागरिकांनीही बेजबाबदारपणे वागत नियमांचे उल्लंघन केल्याने रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच गेली. त्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली. ज्या गावात गेल्या वर्षी एखादा रुग्ण आढळला होता. अशा तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्युदरही जास्त आहे.

सद्यस्थितीत निर्माण झालेल्या चिंताजनक परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून शासन व प्रशासनाकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तरीही काही बेजबाबदार नागरिकांमुळे हा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे येत्या काळात हे निर्बध आणखी कडक होण्याची चिन्हे दिसत आहेत, नागरिकांनी वेळीच आपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करायला हवे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!