Share

‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’

Published On: 

परभणी : माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा सहभाग आहे. महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्य शिकुन सेंद्रीय खत निर्मिती करावी, असे प्रतिपादन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांनी सोमवारी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाच्या वतीने भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अनुदानीत मानव विकास अनुसूचित जाती उपयोजना प्रकल्पांतर्गत पाच दिवसीय सेंद्रीय खत निर्मिती तंत्रज्ञानावरील महिला प्रशिक्षणाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले हे होते.  आयोजक प्राचार्य डॉ. सय्यद ईस्माईल, महिला आर्थिक विकास महामंडळच्या परभणी जिल्हा समन्वयक श्रीमती निता अंभोरे, डॉ प्रविण वैद्य, डॉ. हेमंत देशपांडे आदींची यावेळी उपस्थिती होती.

वेळी डॉ. धर्मराज गोखले म्हणाले, की शेतीत सेंद्रीय खतांचा वापर न करता केवळ रासायनिक खतांचा अति वापर केल्यामुळे दिवसेंदिवस मातीचे आरोग्य खालवत आहे, त्यामुळे पिकांच्या उत्पादनातही घट येत आहे. माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक असुन घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा वाटा असुन महिलांनी सेंद्रीय खत निर्मिती कौशल्य अवगत करून सेंद्रीय खत निर्मिती करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!