Share

मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा : भाजपा

Published On: 

मुंबई : भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे.

दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे. .

विशेष म्हणजे शिवसेनेकडून यासाठी गुजरातींसाठी मेळावा आयोजित करण्यात आला असून त्याला ही अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान,शिवसेनेचा मुख्य विरोधक असलेल्या भाजपने या मुद्द्यावरून देखील टीका केली आहे. शिवसेनेने साद घातली असली तरी गुजराती मतदाराने मनात ठाम ठरवले आहे ”मुंबई मा जलेबी ना फाफडा, ‘जनाबसेने’ला आपटा” असं म्हणत आ. अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर टीकेचा बाण सोडला आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!