Share

विनामास्क आढळल्यास ‘या’ राज्यात थेट अटक करण्याचे आदेश

Published On: 

हिमाचल प्रदेश  : करोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा देशभरात थैमान घातले आहे. यामागे नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे प्रमुख कारण आहे. करोनाच्या संसर्गापासून बचावासाठी मास्क वापरणे ही प्राथमिक खबरदारी असतानाही लोक याकडेही दुर्लक्ष करताना दिसत आहेत. वारंवार जनजागृती करुनही या नियमाचा भंग होत असल्याने आता हिमाचल प्रदेश या राज्याने याविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, जर कोणी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास त्याला थेट अटक करण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिले आहेत.

“कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी विनामास्क आढळल्यास तिला कुठल्याही वॉरंटशिवाय अटक करण्यात येईल, तसेच या गुन्ह्याबद्दल आठ दिवसांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल किंवा ५००० रुपयांचा दंड आकारण्यात येईल,” अशी माहिती सिरमौरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

तसेच आठ जिल्ह्यांमध्ये नाईट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री ८ ते सकाळी ६ या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमध्ये कोणालाही बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशानुसार, जयपूर, जोधपूर, कोटा, बिकानेर, उदयपूर, अजमेर, अलवार आणि भिलवाडा या आठ जिल्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंतच बाजार, रेस्तराँ, शॉपिंग मॉल्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणं उघडी राहणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!