Share

विरोधकांचे दौरे म्हणजे “राजकीय पर्यटन” सामनातून टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. आणि  अशात विरोधी पक्षाकडून ‘राजकीय पर्यटन’ केले जात आहे. अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

महाराष्ट्रात एक सरकार आहे. मुख्यमंत्री आहेच आहे व ही व्यवस्था लोकशाही तसेच घटनात्मक मार्गाने सत्तेवर आली आहे. त्यामुळे तळिये-चिपळूणपर्यंत सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, नांदेडपर्यंत जेथे जेथे जलप्रलयाने नुकसान केले त्या प्रत्येक घरात मदत पोहोचविण्यासाठी ठाकरे सरकारला शर्थ करावी लागेल. बाकी कुणी या संकट प्रसंगाचे राजकीय पर्यटन करून व्यक्तिगत राग-लोभाचा चिखल उडवीत असेल तर तो त्यांचा प्रश्न. केवळ पाहायला आलो नाही, तर सर्वतोपरी मदतही देणार, असे विरोधी पक्ष सांगतोय. आपले राज्य, आपले सरकार यांच्यावर विश्वास न ठेवणाऱ्या विरोधी पक्षाविषयी आणखी काय बोलावे, केंद्राकडून काय आणायचे ते आणा; स्वागतच आहे.असा निशाना साधत संजय राऊत यांनी विरोधी पक्षावर टीका केली आहे.

लोक अद्याप धक्क्यातून सावरलेले नाहीत. अनेकांनी कुटुंबेच्या कुटुंबे गमावली आहेत. त्यांना या धक्क्यातून सावरणे कठीण आहे. तळियेसारख्या गावांचे पुनर्वसन करणे हे केंद्राचे नसून राज्याचेही कर्तव्य आहे. त्यामुळे केंद्राने मदतीचा ओघ सुरू ठेवावा. ‘तौकते’ चक्रीवादळात केंद्राने गुजरातला एक हजार कोटींची मदत केली. तशी मदत महाराष्ट्राला करावी व महाराष्ट्राच्या केंद्रीय मंत्र्यांनी या रकमेचा धनादेश केंद्राकडून घेऊन यावा. असे सुचवत संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला मढय़ावरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करू नये असा सुतोवाच दिला आहे.

चिपळूणच्या बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला. ज्यांनी निसर्गकोपात सर्वस्व गमावले त्यांच्या संतापाचा स्फोट झालाच तर राज्यकर्त्यांनी तो समजून घेतला पाहिजे. त्यामुळे अशा वेळी संयम आणि समन्वय ठेवणे गरजेचे असल्याचेही संजय राऊत यांनी सामनातून म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!