Share

“राज ठाकरेंच्या सभेला विरोध कायम, सभेवर बंदी घालावी’ ; प्रकाश आंबेडकरांचा पुनुरुच्चार

Published On: 

अकोला : विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक राज्य सरकारने घेतली. या बैठकीत फक्त भोंग्यावरच बोला, असे बैठकीत म्हटले. सर्वोच्च न्यायालयाने भोंग्यासंदर्भात परवानगी दिली आहे. तो आदेश केंद्र सरकारला व इतर राज्य सरकारला लागू आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत भोंग्यासंदर्भात धोरण ठरविण्याबाबत राज्य सरकार हे केंद्र सरकारला आवाहन करणार आहे. हा वेगळाच प्रकार आहे. शंका निर्माण करणारा आहे. राज ठाकरे यांच्या सभेला विरोध कायम आहे, शासनाने सभेवर बंदी घालावी. राज्य सरकार दबावाखाली असल्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यांवरील ईडी व सीबीआयची चौकशी वाचविण्यासाठी राज्य सरकार हा खेळ करीत आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

भाजप आणि मनसेची भूमिका हीच राज्य सरकारची भूमिका असल्याची शंका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यात काही तरी घडण्याची शक्यता आहे. ३ मे ला काहीतरी घडणार असे वाटते. परंतु, राज्य सरकारने विरोधी पक्षाच्या बैठकीत काहीही बोलण्याची संधी दिले नसल्याने, आम्ही १ मे ला शांती मार्च राज्यात काढणार आहोत, असेही आंबेडकर म्हणाले.

या मार्चमध्ये ज्या संघटना सहभागी होतील त्यांचे आम्ही स्वागत करणार आहोत. परंतु इतर राजकीय पक्षांचे आम्ही स्वागत करणार नाही. मनसे हा महाराष्ट्रव्यापी पक्ष नाही. मुंबईत सुद्धा सर्वच वॉर्डांमध्ये त्यांचं अस्तित्व आहे का नाही, हे माहिती नाही. पण ज्या पद्धतीने सतत इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रेस हा प्रश्न उचलून धरतो, असे भासवले जाते की राज्यभर यांची असणारी संघटना ही मजबूत आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

राज्यभर मनसे ही संघटना मोठी नाही. त्यांचे अस्तित्व काही भागामध्ये प्रभावशाली आहे, याबद्दल दुमत नाही. मात्र एवढे बळ यांच्या पाठीमागे आले कोठून? कोणत्यातरी पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे असे वाटत असून त्याशिवाय ते मोठे होऊ शकत नाही, असा टोला अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपला लावला.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!