Share

विरोधकांचे नकारात्मक राजकारण सुरूच; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी दोन्ही सदनांच्या सभासदांसमोर राष्ट्रती अभिभाषण करतात. मात्र यंदाच्या अधिवेशनाआधी होणाऱ्या या अभिभाषाणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

विरोधी पक्षांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने कृषी कायद्यांना मंजुरी देण्यात आली त्याचा विरोध करण्यासाठी हा बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं विरोधी पक्षांनी स्पष्ट केलं आहे. या सर्व घडामोडींवरून विरोधकांचे नकारात्मक राजकारण सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

१६ विरोधी पक्षांनी हा बहिष्कार टाकला आहे.राष्ट्रपती कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस आणि एआययूडीएफ यांचा समावेश आहे.

‘आम्ही १६ राजकीय पक्षांद्वारे एक निवदेन जारी केले असून संसदेत होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार घालणार आहोत. या निर्णयामागील मुख्य कारण म्हणाजे केंद्र सरकारने कृषी कायदे सभागृहात विरोधकांशिवाय जबरदस्तीने मंजूर केले आहेत’, असे राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!