Share

‘मुक्कद्दर’ चा सिकंदर स्वप्निल कोलते काळाच्या पडद्याआड !

Published On: 

🕒 1 min read

पुणे : प्रसिद्ध लेखक, व्याख्याते व इतिहास संशोधक स्वप्निल कोलते यांचे २६ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांनी मराठा साम्राजातील विविध सरदारांच्या जीवनावर अभ्यास करून मराठ्यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या ‘मुकद्दर’ या दर्जेदार कादंबरीची निर्मिती केली होती. प्रचंड संशोधन करून त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले होते. या पुस्तकाच्या माध्यमातून स्वप्नील यांनी इतिहास संशोधन व महापुरुषांच्या आत्मचरित्रावरील अतिशय नेमक्या माहितीचे भांडार उपलब्ध करून दिले आहे. स्वप्नील यांची मुकद्दर ही कादंबरी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यामुळे पुणे परिसरातच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे कौतुक केले जात होते.

स्वप्निल यांचे ‘उनाड कवी’ हे देखील पुस्तक प्रकाशित झाले आहे. निर्भीड लेखणीच्या बळावर त्यांनी नावलौकिक मिळवला होता. दरम्यान, त्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ‘शेरे दख्खन’ या पुस्तकाचे लेखन चालू होते. मात्र, रस्ते अपघातात स्वप्निल कोलते यांचा जागीच मृत्यू झाल्याने वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रासह शिवभक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. योग्यरित्या इतिहासाची मांडणी करणाऱ्या लेखकाच्या जाण्याने कला आणि साहित्य क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

स्वप्निल कोलते मंगळवारी (दि. २६ जानेवारी) रात्री शिरूरहून घरी परतत होते. त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर इनामदार वस्तीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात स्वप्निल यांचा जागीच मृत्यू झाला. एका मोबाईल कंपनीत वितरणाचे काम करत करत त्यांचे इतिहास संशोधन करून इतिहास रुजवण्याचे कार्य सुरु होते. दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे यांचा शिष्य ते उद्योन्मुखी लेखक अशी स्वप्निल कोलते यांची ओळख निर्माण झाली होती. ते खऱ्या अर्थाने प्रमोद मांडे यांचा वारसा पुढे नेत होते.

दरम्यान, प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी देखील स्वप्निल कोलते यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ‘नियतीचा पुन्हा क्रुर घाला… स्त्यावरील अपघातात लेखक मित्र स्वप्निल कोलते पाटील गेला .. मित्रा स्वप्निल परवा तुला तुझ्या अप्रतिम लेखनासाठी व्हिडिओ बाईट दिला .. मुक्कदर वाचुन तुझं कौतुक उभा महाराष्ट्राला अजुन करायचं होतं रे .. तु सध्या शंभुराजांवर शेरे दख्खन लिहीत होतास .. इतिहासावर दोन्ही छत्रपतीं वर भरभरून बोलणारा , लिहणारा तरूण लेखक गेला .. मित्रा भावपूर्ण श्रध्दांजली’ अशा शब्दात त्यांनी आपलं दुःख व्यक्त केलं आहे.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/3875399569147956

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!