🕒 1 min read
नवी दिल्ली- काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी आपल्या तीन मूर्ती लेन निवासस्थानी आयोजित केलेल्या डिनर पार्टीमध्ये जवळपास एक डझनहून अधिक विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याबाबत आणि भारतीय जनता पार्टीला 2022 मधील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका आणि 2024 साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पराभूत करण्याबाबत चर्चा केली आहे.
या डिनर पार्टीत सहभागी झालेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला उपस्थित होते.
Delhi: NCP chief Sharad Pawar, TMC MP Derek O'Brien, RJD chief Lalu Prasad, DMK's Tiruchi Siva, RLD leader Jayant Chaudhary, Samajwadi Party chief Akhilesh Yadav, Congress MPs Shashi Tharoor & Anand Sharma & other Opposition leaders arrive at Kapil Sibal's residence for a meeting pic.twitter.com/RgHsMXDBmj
— ANI (@ANI) August 9, 2021
विशेष म्हणजे यावेळी भाजपला रोखण्याबाबत तर चर्चा झालीच मात्र काँग्रेसमधील बदलांसंबंधीही प्रश्न उपस्थित करण्यात आले. गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडलं तरच पक्ष मजबूत करणं शक्य असल्याचंही मत यावेळी काहीजणांनी व्यक्त केल्याचं सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा वाद : नाशिकमध्ये सेनेसह आघाडीत सर्वच पदाधिकारी नाराज
- कंगनाच्या ‘त्या’ याचिकेला जावेद अख्तर यांचा विरोध
- ९ ऑगस्ट ठरला ऑस्ट्रेलिया क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट दिवस
- नीरज चोप्राने बायोपिकसाठी दिली ‘या’ दोन अभिनेत्यांना पसंती
- दुसऱ्या कसोटीसाठी पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव शिवाय टीम इंडिया लॉर्ड्सवर रवाना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
