औरंगाबाद : शहरातील गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी औरंगाबाद महापालिका, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन व लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन ने पुढाकार घेत लाईट हाऊस प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी सामंजस्य करार करण्यात आला असून एप्रिल मध्ये लाईट हाऊसची पहिली बॅच सुरू झाली आहे.
प्रकल्पासंदर्भात माहिती देताना महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटी चे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले की शहरातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे तसेच गरजू विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे मिळावेत यासाठी तिन्ही संस्थांनी पुढाकार घेत हा प्रकल्प सुरू केला आहे. लाईट हाऊस प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी पाच वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. प्रकल्पाची जबाबदारी व आवश्यक खर्च लाईट हाऊस करणार आहे.
लाईट हाऊस मध्ये फाउंडेशन मध्ये फाउंडेशन कोर्स, समुपदेशन कोर्स, कौशल्य विकास प्रशिक्षण व नोकरीच्या संधी असतील. हा प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने सिडको एन-५ येथील कम्युनिटी सेंटर स्मार्ट सिटीला दिले आहे. एसएससीडीएलच्या वास्तुविशारद स्नेहा बक्षी यांनी इमारतीचा कायापालट केला आहे.
प्रकल्पासाठी लागणारे संगणक व इतर साहित्य स्मार्ट सिटी द्वारे पुरवल्या जाणार आहे. त्यासाठी ७० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा नायर, इम्रान खान, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली लाईट हाऊस प्रकल्पावर काम केले जात आहे. एलसीएफचे संचालक समीर शेख तसेच सविता सोनवणे लाईट हाऊस चे काम पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईत रुग्णाचे डोळे उंदराने कुरतडले; आशिष शेलारांनी केली शिवसेनेवर खोचक टीका
- ‘बावनकुळेंनी मंत्री असताना इतका भ्रष्टाचार केला की भाजपने तिकिटच दिले नाही’
- ‘आता अँटीबॉडीज लोड होत आहेत’; कोरोनाची लस घेतल्यानंतर कार्तिकने शेअर केला फोटो
- राजीव सातव यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाणांना दिली जाणार संधी ?
- लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढावल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

