बुलढाणा : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आले असताना आयोजित पत्रकार परिषद मध्ये बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत. शिवसेना हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष संबोधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार घणाघात केला होता. त्यावर लगेचच शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
बावनकुळे हे मंत्री असताना त्यांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांना भाजपाने तिकीटच दिलं नाही, आणि आता शिवसेने विरुद्ध गरळ ओकून पक्षात ते आपले महत्त्व वाढविण्याचा आटा-पिटा करीत आहेत अशी तिखट प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.
तर शिवसेने ने पाठीत खंजीर खुपसले हे आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. कारण निवडणुकी पूर्वी समान जागांचा फार्मुला ठरला होता, यासाठी उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले नव्हते तर अमित शहा हे स्वतः मातोश्रीवर येऊन हि बोलणी झाली होती. असे असतांना विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने शिवसेना उमेदवारांच्या विरोधात अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे करून त्यांनीच पाठीत खंजीर खुपसले असल्याचा आरोप देखील प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

