Share

माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार विरोधकांना नाहीच; चव्हाणांचे खडेबोल !

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवण्यात आलं आहे. यामुळे मराठा समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

तर राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले असून सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे. भाजपच्या आरोपांवर आज अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मी माझा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे विरोधकांना माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार नाही. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना फायदा होण्यासाठी महाराष्ट्राची दिशाभूल करण्यासाठी मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे माझे स्पष्ट मत आहे.’ अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी भाजपच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.

लॉकडाऊन संपताच १६ तारखेपासून मराठा समाज आक्रमक; पहिल्या मोर्चाचं ठिकाणही ठरलं !

बीडमध्ये आज (६ मे ) मराठा आरक्षण रणनीती संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि मराठा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली आहे.

या बैठकीत लॉकडाऊन संपल्यावर 16 मे पासून मोर्चा काढण्यावर एकमत झालं आहे. बीडमधून पहिला मोर्चा काढला जाणार आहे. उद्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. हे मोर्चे राज्यभरात काढण्यात येतील, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली. यामुळे कोरोना हाताळताना त्रेधा तिरपीट झालेल्या राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!