Share

Operation Ganga: युक्रेनहून परतलेल्या १८२ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नारायण राणे विमानतळावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशिय-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत मंगळवारी (१ मार्च )सकाळी मुंबई विमानतळावर १८२ विद्यार्थी दाखल झाले.(182 students returning from Ukraine)  त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane ) यांनी विमानतळावर हजेरी लावली.

विद्यार्थी विमानातून उतरण्यापूर्वी नारायण राणे यांनी विमानात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. दरम्यान राज्यातील विद्यार्थ्यांना युक्रेनहून परत आणण्याच्या मोहीमेवरून सध्या श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे. गेल्यावेळी युक्रेनहून मुंबईत विमान आले तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही विमानतळाबाहेर उपस्थित होते.

दरम्यान ऑपरेशन गंगा या मोहिमेंतर्गत आतापर्यंत युक्रेनहून ६०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अजून अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांचे खाण्यापिण्याचे प्रचंड हाल तिकडे सुरु आहेत. यासाठी भारत त्यांना मायदेशी आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!