नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात रशिया विरुद्ध युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) लष्करी आघाडीत सहभागी होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. या रशिया विरुद्ध युक्रेन युद्धामुळे जगातील सर्वच देशांवर परिणाम झाले आहेत. भारत देशातील अनेक विद्यार्थी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षण घ्यायला गेले आहेत. परंतु रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे हे भारतीय मोठ्या प्रमाणात युक्रेन देशात अडकले आहेत. या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत मायभूमीत आणण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे.
त्यातच आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रशिया- युक्रेन युद्धावरून सलग दुसऱ्या दिवशी आणि एकूण चौथ्यांदा बैठक झाली आहे. देशाचे प्रधानमंत्री आज उत्तरप्रदेशच्या निवडणुकीच्या दौऱ्यावर होते. परंतु उत्तरप्रदेशचा दौरा अर्धवट सोडून मोदी आज दिल्लीला युक्रेन संबंधी बैठकीसाठी त्वरित निघून गेले. या बैठकीत यूक्रेनच्या शेजारी राष्ट्रांसोबत संबंध आणि सहकार्य अजून वाढवण्याबाबत चर्चा झाली आहे .युक्रेनच्या शेजारी देशांशी जेवढे चांगले संबंध तेवढ्या लवकर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय लोकांना परत मायभूमीत आणणे सोप जावं या उद्देशाने भारत सरकार युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांशी संबंध वाढवत आहे.
या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलदोमीर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधला आहे . काहीच दिवसांपूर्वी मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी संवाद साधून चर्चा करुन हिंसा थांबवून चर्चेतून तोडगा काढण्याचा सल्ला दिला होता.
महत्वाच्या बातम्या :
- ‘महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं’ – वामराव चटप
- Russia Ukraine war:रशिया युक्रेनशी युद्धबंदीचा करार करण्यास तयार : रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की
- भगतसिंग कोश्यारींविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक
- IPL 2022: मयंक अग्रवाल ‘पंजाब किंग्ज’ चा नवा कर्णधार म्हणून घोषित
- Russia-Ukraine war : शांतता पुनर्प्रस्थापित व्हावी म्हणून दलाई लामा यांनी केली प्रार्थना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

