Share

Russia Ukraine war: युक्रेनमधील बीअर कंपनीचा देशासाठी एक वेगळाच उपक्रम

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाचे लष्कर हे अत्यंत ताकदवान असल्याने युक्रेनच्या लष्कराचा रशियाच्या लष्करासमोर निभाव लागत नाहीये. तरी युक्रेनचे सरकार आणि युक्रेनमधील नागरिक आपल्या आपल्या परीने रशिया विरुद्ध युद्ध लढत आहे.

त्यातच आज युक्रेनमधील बीअर कंपनीने युक्रेन सैन्याला मदत व्हावी म्हणून दारू सोडून दारुगोळा तयार करायचा निर्णय घेतला आहे. रशियन सैन्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रवदा ब्रुअरीच्या कर्मचाऱ्यांनी बीअरऐवजी मोलोटोव्ह कॉकटेल बॉम्ब बनवण्यास सुरुवात केली आहे.प्रवदा ब्रुअरीचे मालक युरी झस्ताव्हनी यांनी मोलोटोव्ह कॉकटेल पेट्रोल बॉम्बबद्दल बोलताना सांगितले की ” युक्रेनचे सैन्य एका मोठया संकटात अडकले आहे. आपल्याच लोकांचे संरक्षण लष्कर नेहमीच करत असते. आता तेच लष्कर संकटात सापडले असताना ; त्यांची मदत करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे आणि तेच आम्ही करत आहोत. कोणाकडूनही अपेक्षा न करता आपणच युक्रेनच्या लष्कराला मदत करावी या उद्देशानेच आम्ही आता बीअर ऐवजी दारुगोळा बनवण्यास सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!