🕒 1 min read
मुंबई : ऑस्ट्रलियाचा संघ २४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तानचा दौरा करत आहे. मात्र यापूर्वी एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू अॅश्टन अगर याला त्याच्या पत्नीच्या सोशल मीडिया हँडलवर पाकिस्तानच्या ऐतिहासिक ऑस्ट्रेलिया दौर्याला सुरुवात होण्यापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) या दोघांनीही अॅश्टन अगरच्या (Ashton agar) पत्नीला सोशल मीडियावर पाठवलेल्या जीवे मारण्याच्या धमकीची चौकशी केली आहे आणि ज्यात तिला इशारा दिला आहे की आगरने पाकिस्तानला जाऊ नये. या धमकीच्या मेसेजबद्दल आगारच्या पत्नीने तत्काळ क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (pakistan cricket board) कळवले.
https://twitter.com/cntact2saurabh/status/1498341759965097986?s=20&t=llhe5CMrwqk0xrx2VCBbDg
ऑस्ट्रेलिया टीमच्या प्रवक्त्याने पुष्टी केली आहे की अॅश्टन अगर यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत परंतु टीम सुरक्षेच्या तपासणीनंतर असे आढळून आले की हा धोका विश्वासार्ह नव्हता. हा मेसेज बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून आला होता, तो बहुधा भारतातूनच असावा. ऑस्ट्रेलियाच्या पाकिस्तान दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका, जी ४ ते २५ मार्च दरम्यान खेळली जाईल, तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका, जी २९ मार्च ते २ एप्रिल दरम्यान खेळली जाईल आणि एकमेव T20 आंतरराष्ट्रीय सामना ५ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- रस्ते अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारचा ”महत्वाचा” निर्णय
- Russia Ukraine war: नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सलग दुसऱ्या दिवशी महत्वाची बैठक
- Russia Ukraine war: रशियाचा अमेरिकेवर पलटवार; अनेक देशांचे आर्थिक नुकसान
- Russia Ukraine war: युक्रेनमधील बीअर कंपनीचा देशासाठी एक वेगळाच उपक्रम
- Russia Ukraine war: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांचे खाण्याचे हाल ; विद्यार्थिनी म्हणाली …
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
