सिंधुदुर्ग : शिवसेना आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यातील वैर महाराष्ट्रात सर्वांना ठाऊक आहे. राजकारणाची सुरुवात शिवसेनेसोबत केल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या सत्तेतील मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती. यानंतर काही राजकीय वादामुळे त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
काँग्रेस सरकारच्या काळात देखील त्यांनी विविध मंत्रिपद सांभाळले. यानंतर शिवसेनेशी छत्तीसचा आकडा निर्माण झाल्यामुळे अनेकदा शिवसेना विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष पाहायला मिळाला. नारायण राणे यांनी स्वतःचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढल्यानंतर २०१९ मध्ये भाजपात प्रवेश केला. सद्या ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असून त्यांचे चिरंजीव नितेश राणे हे आमदार आहेत.
तर, माजी खासदार निलेश राणे हे देखील भाजप पक्षातच आहेत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून राणे पिता-पुत्रांनी अनेक मुद्द्यांवरून शिवसेनेसह सरकारवर घणाघाती टीका सुरु ठेवल्याचं दिसून आलं होतं. आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.
कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येईल. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा प्रहार नारायण राणेंनी केला. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका देखील राणेंनी यावेळी केली.
महत्वाच्या बातम्या
- गेल्या दोन महिन्यात सक्रीय रुग्णसंख्येची टक्केवारी तिपटीने घटली ?
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक


