🕒 1 min read
नांदेड : देगलूरचे काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे रिक्त जागेवर ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार सुभाष पिराजी साबणे हे भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर केली.
त्यानंतर आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सुभाष साबणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. या पक्षप्रवेशानिमित्त भाजपचा मेळावाही पार पडला. या मेळाव्यात बोलताना रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत मतदारांना अजब आवाहन केले.
देगलूर येथील मेळाव्यात बोलताना सदाभाऊ म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील लोक नोटा मोजून थकली आहेत. या पोटनिवडणुकीत पैशांचा महापूर येणार आहे. लक्ष्मी आली की दरवाजा उघडा ठेवा. हे शपथ मागतात तेव्हा खोटी शपथ घ्यायची. मशीनने मोजलेले पैसे घ्यायचे, पण मतदान साबणेंना द्यायचे, असे अजब आवाहन त्यांनी केले.
‘ठाकरे सरकारने अगोदर शेतकऱ्यांना मदत द्यावी, मग मतदान मागावे. घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्षे बोंबलत बसा असे होऊ देऊ नका’, असा सल्लाही सदाभाऊंनी मतदारांना दिला आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
