राळेगणसिद्धी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने राज्याला अनेक निर्बंधांतून शिथिलता देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. राज्यातील बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्याप्रमाणावर नाराजी वाढत आहे.
दरम्यान आज अहमदनगरच्या मंदिर बचाव समितीनं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. बंद मंदिरे खुली करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली.त्यावर अण्णा हजारे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. दारूची दुकाने सुरू केली. मंदिरे खुली करण्यात सरकारला काय अडचणी आहेत, असा सवाल त्यांनी केला. १० दिवसांत मंदिरं खुली करण्याबाबत निर्णय घेतला नाही तर जेलभरो आंदोलन करा, मी तुमच्या सोबत आहे, असं अण्णा म्हणाले.
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का? जेथून मिळणाऱ्या सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारवर संतापले आहेत.
#अहमदनगर : मंदिर उघडण्याच्या मागणीवरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी @OfficeofUT राज्य सरकारला दिला गंभीर इशारा @narendrafirodia @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @ChDadaPatil @girishdmahajan @drsujayvikhe pic.twitter.com/3cn7HfK9b6
— I Love Nagar (@ilovenagar) August 28, 2021
अण्णा हजारे पुढे म्हणाले, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर एवढासाही कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले? त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलावे व त्वरित मंदिरे उघडावीत, असे अण्णांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीसाठी परभणीकरांची एकजूट, स्वाक्षरी मोहीम यशस्वी
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

