परभणी : जिल्ह्यामध्ये पीपीपी वैद्यकीय महाविद्यालय नाही तर शासकीय वैद्यकीय महाविद्याल स्थापन व्हावे यासाठी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पुढाकार घेतला आहे. शिवसेनेचे खासदार असतांना तसेच राज्यात शिवसेनेची सत्ता असतांनाही परभणी शिवसेनेला आंदोलन करावे लागत आहे. या आंदोलनादरम्यान जिल्हाभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
या संदर्भात खासदार जाधव यांनी सांगितले की, ‘परभणी येथे PPP वैद्यकीय महाविद्यालय नकोय तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच स्थापन व्हावे यासाठी जिल्ह्याभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. मी खासदार या नात्याने उभारलेल्या सर्वपक्षीय स्वाक्षरी मोहिमेत यावेळी एक परभणीकर म्हणून आ.डॉ. राहुल पाटील, ह.भ.प अच्युत महाराज दस्तपुरकर यांच्या समवेत महापौर रवींद्र सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, जि.प. सभापती गंगाप्रसाद आनेराव आदिंची उपस्थिती होती. या आंदोलनात सर्व परभणीकरांनी सहभागी व्हावे आणि आपल्या हक्काचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळेपर्यंत या लढ्यात साथ द्यावी.’
परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होत आहे. मात्र, अद्याप हा विषय मार्गी लागलेला नाही. आता शिवसेनेची सत्ता असतांनाही हा विषय मार्गी लागत नसल्याने शिवसेनेच्या परभणी शाखेच्या वतीनेच हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. मागणी मान्य झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही खासदार जाधव यांनी दिलेला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार- यशोमती ठाकूर
- ओबीसी आरक्षण बैठकीला वांझोटी म्हणणाऱ्यांवर विजय वडेट्टीवार संतापले, म्हणाले..
- ..तर पोलिसांनी भाजपा नेत्यांचे मुसक्या आवळाव्यात, कुठलीही दया दाखवू नये-सचिन सावंत
- ‘नेत्यांना पक्षात घेऊन वापरायचे, हेच भाजपचे धोरण’, जयंत पाटलांची टीका
- ‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

