Share

दरेकरांची दोन पत्रकारांविरोधात खंडणीची तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार; दिला ठिय्या

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजपा नेते तथा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी मुंबईतील एमआरए पोलीस ठाण्यात दोन पत्रकारांविरोधात मानहानी व खंडणी वसुलीची तक्रार दिली आहे. लोकसत्ताचे पत्रकार संदिप आचार्य व निशांत सरवणकर अशी या दोन पत्रकारांची नावे असल्याची माहिती प्रविण दरेकर यांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, प्रविण दरेकर, भाजपा आमदार प्रसाद लाड, (Mla Prasad Lad) आमदार कालीदार कोळंबकर (Mla Kalidas Kolambkar) हे एमआरए पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. यावेळी भाजपा आमदारांसह अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिल्यानंतर तक्रार दाखल करुन घेण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला होता. नेत्यांसह कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली. याबाबत प्रविण दरेकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले, लोकसत्ताचे पत्रकार संदिप आचार्य व पत्रकार निशांत सरवणकर यांच्याविरोधात एमआरए पोलीस ठाण्यात मानहानी आणि खंडणीची तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता, ती तक्रार दाखल करून घेतली जात नव्हती! पोलिसांवर दबाव टाकण्याचे काम केले जात होते पण आमच्या मागणीवर ठाम असल्यामुळे तक्रार दाखल करून घेण्यात आली. असे ट्विट दरेकरांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!