Share

विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात यंदा होणार केवळ नावांचे वाचन

Published On: 

औरंगाबाद : विद्यापीठाच्या ऑनलाइन दीक्षांत समारंभात २५ जून रोजी मे अखेरपर्यंत पीएचडी मिळालेल्या ४८४ संशोधक विद्यार्थ्यांना आता प्रत्यक्ष पदव्यांचे वितरण होणार नाही. त्या दिवशी फक्त त्यांच्या नावांचे वाचून होईल. हा समारंभ यंदा ऑनलाइन पद्धतीने होणार असला तरी तो अविस्मरणीय व्हावा यासाठी आपण सर्वजण सामूहिक प्रयत्न करू असा विश्वास कुलगुरु डॉ प्रमोद येवले यांनी व्यक्त केला.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ येत्या २५ जून रोजी होणार आहे या पार्श्वभूमीवर गुरुवारी कुलगुरूंनी आढावा बैठक घेतली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता वाल्मीक सरवदे आदींची उपस्थिती होती.

यावेळी कुलगुरू डॉ प्रमोद येवले म्हणाले यंदा राज्यातील सर्व विद्यापीठांचे दीक्षांत समारंभ ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे निर्देश आहेत. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती भगत सिंह कोश्यारी असतील. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सर्व अधिष्ठाता व्यवस्थापन परिषदेचे सदस्य या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत कार्यक्रम होईल. या वेळी पीएचडी संशोधकाच्या नावाचे वाचून होईल. ३१ मेपर्यंत ४८४ संशोधकांनी पीएचडी पदवी मिळवली असून यामध्ये कला व सामाजिक शास्त्रे २१६, विज्ञान व तंत्रज्ञान ६५, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ५८ व आंतर विद्याशाखेच्या ४५ संशोधकांचा समावेश आहे. हा सोहळा अत्यंत शिस्तबद्द व प्रोफेशनल पद्धतीने होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनासाठी विविध १२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!