Share

‘काँग्रेसला गाडण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचारचं गाडून टाकले’

Published On: 

मुंबई : माझी खुर्ची खेचाल, खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘लोकसत्ता’ दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

यावर भाजपा नेते निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. ‘काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय’, असं म्हणत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘काय नाटक आहे… प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे, कसलं कर्तव्य आणि कसलं काय. साहेबांनी सांगितलं होत काँग्रेसला कायमचा गाडून टाका उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारचं गाडून टाकले.’ अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्र्यांनी बोलताना बाळासाहेब ठाकरेंना दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. ‘माझं कधीही स्वप्न नव्हतं. शेवटी एक पुत्रकर्तव्य असतं. मी माझ्या वडिलांना हातात हात घालून वचन दिलं होतं. मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रिपदावर बसवणार. पण हे मी का म्हटलं त्यांना? कारण त्यांचा वारसा पेलण्याची जबाबदारी मी समर्थपणे घेतली आहे. नाही तर माझ्या आयुष्याचा उपयोग काय? मी घेतली ही जबाबदारी. त्यातून मी पुढे गेलो. माझ्यासाठी नाही काही केलं. मला मुख्यमंत्रिपदाची अजिबात अभिलाषा नव्हती.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!