Share

‘देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मुलांसाठी काढलेली राज्यातील सर्व वसतिगृहे सुरू करा’

Published On: 

जालना : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील काही ठिकाणची वसतिगृहे सुरू झाली मात्र काही ठिकाणची वसतिगृहे अद्याप सुरू नाहीत. राज्यातील मराठा समाजासाठी असलेली सर्वच्या सर्व वसतिगृहे सरकारने सुरू करावेत, अशी मागणी माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने परतूर येथील डिव्हिजन २ जालना येथे हलवण्याचे प्रस्तावित केलेले असून हे केवळ राजेश टोपे यांच्या बाल हट्टामुळे होत आहे. मराठा समाजासाठी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील विश्रामगृहामध्ये थाटण्याचा घाट घातला जात आहे. मात्र या जागेवर यापूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करण्याचे निश्चित झाले होते. या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारच्या काळात या वसतिगृहाची इमारत दुरुस्ती केली होती. मात्र, या ठिकाणी वसतिगृहाला प्रत्यक्षात सुरुवात होऊ शकली नाही.

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचे वसतिगृह चालवण्याच्या निविदाही सामाजिक संस्थांकडून मागवण्यात आल्या होत्या. मात्र पुढे आचारसंहिता लागल्याने हे वसतिगृह सुरू होऊ शकले नाही. निवडणुकी नंतर आघाडीचे सरकार सत्तेत आले मात्र, त्यांनी या बाबत कुठलीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याची टीका आमदार लोणीकर यांनी केली आहे. राज्य सरकारने तत्काळ मराठा समाजातिल विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृहे सुरू करावेत अशी मागणी लोणीकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!