Share

‘संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आरक्षणासाठी केंद्र सरकारवर दबाव आणावा’

Published On: 

सांगली : मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सरकारकडून पावले टाकण्यात येत आहेत, आणि भविष्यातीही टाकली जातील. कायद्याने आरक्षण कसे घेता येईल याची चर्चा सुरू आहे. छत्रपती संभाजी महाराज आणि उदयनराजे यांच्याबद्दल आदर, आंदोलन हा वेगळा विषय, पण सर्वांनी राज्य सरकार सोबत चर्चा चालू ठेवून केंद्र सरकारवर दबाव आणला पाहिजे, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली.

दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्त आज रायगडावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केले. यावेळी अनेक शिवभक्त रायगडावर हजर होते. या कार्यक्रमानंतर शिवभक्तांशी संवाद साधताना छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.

खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!