मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून आरोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
दरम्यान सध्या कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे. परंतु तरी देखील तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. अनेक नागरिक सध्या दोन लसी घेतल्यामुळे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. अनेकजण मास्कचा देखील वापर करत नसल्याचे पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे बोलत होते. यावेळी ते म्हणाले कि, ‘ज्यांनी दोन लस घेतल्या असतील तरी मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या तरी तोंडावरचा मास्क हटणार नाही,’ असे राजेश टोपे यावेळी म्हणाले आहेत.
तसेच दोन्ही लसी घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटिबॉडीज तयार होत असतात. त्याशिवाय जर तुम्ही अँटीबॉडीज चेक केल्या असतील आणि शरीरात जर भरपूर अँटीबॉडीज असतील तर त्या व्यक्तीला कुठलाही काही प्रॉब्लेम नसतो. पण शास्त्रीय पद्धतीने लस घेणाऱ्या व्यक्तीकडून इतरांना संसर्ग होत नसला तरी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग राखणे ही महत्त्वाची गरज आहे, असेही राजेश टोपेंनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- दिलीप कुमार यांची प्रकृत्ती खालावली; शरद पवार भेटीसाठी रुग्णालयात
- मराठा असो वा कोणीही असो, संभाजीराजेंवरील टीका सहन करणार नाही; मराठा समन्वयकांचा इशारा
- स्पुतनिक लसीचा जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात मोठा साठा उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री
- लसीकरणाला गती देण्यासाठी, औरंगाबादेत लस न घेता रस्त्यावर फिराल तर बसेल ५०० रुपयांचा दंंड!
- अडीच टक्के पॉझिटीव्हीटी रेट असलेला लातूर जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

