Share

Ajit Pawar | “…म्हणून मी शिर्डीच्या शिबिराला गेलो नाही”, अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Published On: 

Ajit Pawar | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) गेल्या अनेक दिवसांपासून शांत होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अशातच अजित पवार यांनी आज अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. याचवेळी त्यांनी शिर्डीच्या सभेला उपस्थिती न लावल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

यावेळी, मी चार आणि पाच तारखेला रात्री उशिरा इकडून बाहेरगावी गेलो होतो. परदेशात आणि 10 तारखेला रात्री उशिरा परत आलो अकराला मी दिवसभर आपल्या मावळमध्ये होतो. 12 तारखेला मी माझ्या माहितीप्रमाणे नगर जिल्ह्यात होतो. शिरूर लोकं मला भेटली आणि आज मी बारामतीमध्ये आहे. मी त्यावेळेस मला काय बोलायचं ते त्या ठिकाणी बोललो, नाराजी वगैरे काहीही नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं आहे.

राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार तब्येत ठीक नसताना सुद्धा सभेला गेले. मात्र, लक्ष वेधलं ते अजित पवार यांच्या अनुपस्थितीने. त्यामुळे पवार नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

तसेच, कोण काय बोलतं? कोण कोणाबरोबर जातं? कोण काय करतं? हे सर्व महाराष्ट्रातील जनता बघत असते. काही राजकीय पक्षाचे नेते जाणीवपूर्वक काहीना काही वक्तव्य करत आहेत आणि त्यातून राजकीय वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही आपली परंपरा नाही. अशा गोष्टी महाराष्ट्रात घडता कामा नये. कोणत्याच पक्षाच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून अशी विधाने व्हायला नको, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!