🕒 1 min read
अमरावती : रिपब्लिकन गटांचे ऐक्य करून आगामी महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करण्यात येत आहे. अनेक शहरात अनेक गटांमुळे मतविभाजन होऊन रिपब्लिकन पक्षांना फटका बसतो. महापालिका निवडणुकीत यापूर्वीही आघाडीचे प्रयत्न झाले. पण, अपेक्षित यश मिळाले नाही. आता नवीन आघाडी होत आहे.
या रिपब्लिकन ऐक्यावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाईंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे. ‘रिपब्लिकन ऐक्य व्हावे ही आपलीदेखील इच्छा आहे. मात्र सध्या ते शक्य नसल्याचे सूचक मत आठवले यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत आले, तर रिपब्लिकन ऐक्य शक्य आहे. परंतु, सध्या तरी त्याची तिळमात्र शक्यता वाटत नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढलो तर आमचे आमदार, खासदार निवडून येऊ शकत नाहीत’ असे आठवले म्हणाले.
‘वंचित बहुजन आघाडीनं मागच्या निवडणुकीमध्ये एकट्याच्या बळावर लढण्याचा प्रयोग केला. पण त्यांचा एकही आमदार, खासदार निवडून आला नाही. केवळ मतं खाण्याचं काम केलं गेलं आणि मतं खाण्याचं राजकारण करून सत्ता मिळत नाही,’ असा बोचरा टोला आठवले यांनी प्रकाश आंबेडकर यांना लगावला.
‘रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य व्हावं अशी माझी नेहमीच भूमिका राहिली आहे. मात्र, सध्या तसं काही होईल असं मला वाटत नाही. होत असेल तर त्या ऐक्यामध्ये सहभागी होण्याची आणि कुणाच्याही नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे,’ असं आठवले म्हणाले. ‘प्रकाश आंबेडकर हे पुढं आल्याशिवाय आरपीआयच्या ऐक्याला काही अर्थ नाही. ते येत असतील तर माझी तयारी आहे,’ असं आठवले यांनी स्पष्ट केलं.
महत्त्वाच्या बातम्या
- आश्चर्यम! राऊतांकडून राज्यपालांचे कौतूक; म्हणाले, ‘ते प्रेमळ, सद्वर्तनी, मनमिळावू, पण..’
- भाजपाचे चाणक्य लागले कामाला, एका बाणातून साधणार दोन निशाणे
- बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन
- ‘महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांविरोधात आमच्याकडे पुरावे, त्यांना दोषमुक्तता नको’, एसीबीचा कोर्टात दावा
- भाजप नेते प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांशी बंद दाराआड चर्चा, राजकीय चर्चांना उधाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

