🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि राज्य सरकार यांच्यात झालेला वाद हा चांगलाच पेटला होता. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर कंगणारे मुंबई पोलिसांच्या तपासासह राज्य सरकारवर ताशेरे ओढले होते. यानंतर हा वाद शिवसेना विरुद्ध कंगना असा झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख देखील केला.
यानंतर, कंगनाला मुंबईत पाय ठेवू देणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती. मात्र, शिवसेनेच्या आव्हानाला ललकारत ती याआधीच मुंबईमध्ये येऊन गेली होती. रविवारी अभिनेत्री कंगना रानौत पुन्हा मुंबईत परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर आज कंगनाने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी कंगना हिरवी साडी, नाकात नथ आणि केसात माळलेला गजरा अशा पारंपारिक मराठमोठ्या वेषात आली होती.
‘सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर कंगना रानौतने मोठ्या उत्साहात हसतखेळत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मला मुंबईत राहण्यासाठी केवळ गणपती बाप्पाच्या परवानगीची गरज आहे. मी इतर कोणाकडेही परवानगी मागितली नाही,’ असं म्हणत कंगनाने शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी तिला संजय राऊत यांच्या पत्नीला आलेल्या ईडीच्या नोटीसविषयी विचारणा केली. तुम्हाला मुंबईत येण्यासाठी परवानगी नाकारणाऱ्यांना ईडीची नोटीस आली त्याबद्दल काय वाटते, असे कंगनाला विचारण्यात आले. मात्र, कंगना रानौतने त्यावर बोलायचे टाळले.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेचा भाजपला जबर धक्का; नवी मुंबईतील मातब्बर नेते बांधणार शिवबंधन
- ‘या’ भाजप नेत्याने देशाच्या तिरंग्याचा घोर अपमान केलाय! आता देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करू नये?
- काँग्रेस-शिवसेनेतील धुसफूस शमणार? महाविकास आघाडीतील समन्वय समितीची महत्वाची बैठक
- ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा; भाजप नेत्याचं वादग्रस्त ट्विट
- ‘मुंबईत महापौर बनवायला काँग्रेसकडे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काही मतदार शिल्लक राहिलेत का?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
