मुंबई : शिवसेनेचे दिग्गज नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. वर्षा राऊत यांनी पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरलेले दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ वर्षा राऊत यांनाही ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
याच मुद्द्यावरून कालपासून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपसह ईडीवर आगपाखड केली आहे. ‘बायकांच्या पदराआड लपून खेळी करणं भाजपाने थांबवावं. मी तोंड उघडलं तर केंद्रातील सरकारला हादरा बसेल. राज्यातील सरकार पाडण्यासाठी हे सर्व सुरु असून माझं नाव संजय राऊत आहे, काय उखडायचं आहे ते उखडावं. हे प्रकरण आता भाजपला महागात पडेल. मुझसे पंगा मत लेना, में नंगा आदमी हूं’ असा निर्वाणीचा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
संजय राऊत यांच्या ‘नंगा आदमी हूं’ या वक्तव्यावरून भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. ट्विटरवरून राऊतांची खिल्ली उडवताना अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचं विडंबन केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचं हे विधान चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडू शकतं. राजकीय टीकेसाठी देशभक्तीपर गाण्याचा असा उपयोग हा दुर्दैवीच आहे.
"नंगा" ऊंचा रहे हमारा
— Avadhut Wagh अवधूत सुशीला रमाकांत वाघ (@Avadhutwaghbjp) December 28, 2020
महत्वाच्या बातम्या
- फिनिक्स पक्षाप्रमाणे भारतीय संघाची ‘अजिंक्य’ भरारी !
- ‘माझी मुंबई, माझी काँग्रेस’; स्वबळावर लढण्यावर काँग्रेस ठाम !
- ७ जानेवारीला होणार लाँच ह्युंदाई ट्यूसॉन आणि स्कोडा कारॉक ला टक्कर देणारी ‘ही’ कार
- शेतकरी विरोधी भाजपला गावात ‘नो एन्ट्री’, गावात आले तर घातला जाणार चपलेचा हार !
- ‘ईडी : येथे भाजप विरोधातील नेत्यांना नोटीस दिल्या जातात’


