नवी दिल्ली : भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या भारत श्रीलंका सामन्यातील रोहित शर्माच्या कर्णधारपदाबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. रोहितने या सामन्यात ज्या प्रकारे नेतृत्व केले ते पाहून गावसकर खूप प्रभावित झाले आहेत.
या सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, रोहितने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले ते खरेच कौतुक करण्यासारखे होते. गोलंदाजीत त्याने केलेला बदल, खेळाडूंचे रोटेशन त्याने खूप चांगल्या प्रकारे हाताळले होते. एखादा माणूस निराश जरी झाला असेल तरीही तो रोहितच्या या नेतृत्वाला १० पैकी ९.५ गुण देईल. मी या सामन्यासाठी रोहितला १० पैकी ९.५ गुण देईल.
मोहाली कसोटी सामन्यात भारताने श्रीलंकेला एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत केले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५७४ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर श्रीलंकेला आपल्या पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा पहिला डाव १७४ धावांवर ऑलआउट झाला. त्यामुळे त्यांच्यावर फॉलोऑनची नामुश्की ओढवली. परंतु दुसऱ्या डावातही त्यांचा संघ पूर्णपणे अपयशी ठरला या डावात त्यांनी १७८ धावा केल्या.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
