Share

आता शेतकरीच जास्तीच्या ऊसाचा प्रश्न लावणार मार्गी; हा घेतला निर्णय!

Published On: 

बीड : महाराष्ट्र देशात ऊस उत्पादक संख्या जास्त आहेत. ऊस उत्पादक व उस उत्पादन संख्या जास्त असल्यामुळे समस्या देखील शेतकऱ्यांना तेवढ्याचं उद्भवत असतात. याच कारणाने सध्या महाराष्ट्रात ऊस तोडणी रखडलेल्या आहेत. हंगाम शेवटच्या टप्पात असतानाही शेतकऱ्यांचा 15 ते 20 टक्के उस अजूनही फडात आहे.

लोकप्रतिनीधी, प्रशासन यांनी ऊसतोडणीचे आश्वासन दिले असतानाही प्रत्यक्षात तशी कामे केली जात नाहीत. आता सध्या जिल्हानिहाय ऊस उत्पादक बैठका घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आता शेतकऱ्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आगोदर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या ऊसाची तोड व नंतर बाकी शेतकऱ्यांचा विचार असा निर्णय बीड शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच 10 मार्च ही डेडलाईन दिली आहे. यानंतरही गेटकेनच्या ऊसाला कारखान्यांनी प्राधान्य दिले तर जिल्ह्याच्या हद्दीवरच गाड्या अडविल्या जाणार असा ठाम निर्णय बीड जिह्यातील उस उत्पादकांनी घेतला आहे.

यावर्षी साखर कारखान्यांचे नियोजन बिघडले आहे व 14 महिने उलटले तरी शेतकऱ्यांचा ऊस हा फडातच आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होत आहे. रविवारी बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादकांची बैठक झाली या बैठकीमध्ये 10 मार्चनंतर जर परजिल्ह्यातील ऊस गाळपासाठी आणला गेला तर ऊसाची ट्रक ही जिल्हा हद्दीवरच अडवली जाणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलेला आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!