टीम महाराष्ट्र देशा- गेल्या काही दिवसांपासून बाजारामध्ये कांद्याची आवक कमी झाली असल्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ९०-ते १०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. त्यातच कांद्याची मागणी वाढत असल्यामुळे हे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे.
किलोला शंभर रुपयापर्यंत महागलेल्या कांद्याच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याबरोबरच त्याच्या साठ्यावारही निर्बंध घातले आहेत. त्यानुसार आता कांद्याचे किरकोळ विक्रेते १०० क्विंटल तर घाऊक विक्रेते ५ ०० क्विंटल पर्यंतच साठा करू शकतील .
किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकार १ लाख २० हजार टन कांदा आयात करणार आहे , मात्र त्याच्या किंमती कधी खाली येतील हे सांगणं शक्य नाही असं केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं .
दरम्यान,ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या परतीच्या व अवकाळी पावसाचा मोठा फटका कांद्याच्या पिकाला बसला आहे. त्यामुळे बाजारात होणारी कांद्याची आवक देखील मोठ्या प्रमाणात घटली आहे.
महत्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1199950308287188993?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199951007062446081?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199951930061025280?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1199952362414100480?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

