Share

मेल्ट्रॉन प्रकरणातील एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला; एक अजूनही फरार..

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात दोघा पॉझिटिव्ह रुग्णांच्या जागी दोन डमी रूग्ण एजंटांकरवी भरती करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. या प्रकरणात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून बुधवारी दि. १७ फरार असलेल्या दोन मूळ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी गौरव काथार यास कोरोना सुरक्षितता बाळगत वेदांतनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र दुसरा रुग्ण अजूनही फरारच असून यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सिद्धार्थ उद्यान येथे कोरोनाची अॅन्टिजेन चाचणी केल्यानंतर पॉझिटिव्ह निघालेल्या दोन तरूणांना शनिवारी दि. १३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मेल्ट्रॉन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र सोमवारी हे भरती झालेले हे दोन्ही रूग्ण डमी असल्याचे समोर आल्याने पालिकेची झोप उडाली. मूळात पॉझिटिव्ह असलेले गगन पगारे, गौरव काथार फरार असून त्यांच्याजागी दोन डमी रुग्ण देण्यात आले होते.

सिद्धार्थ उद्यान १२ नोव्हेंबरपासून उघडण्यात आले. पहिल्याच दिवशी दोघेजण पॉझिटिव्ह निघाले. मात्र १३ नोव्हेंबर रोजी दोघांना मेल्ट्रॉनमध्ये भरती होण्यासाठी पाठविण्यात आले असल्याचे डॉ. वैशाली मुदगलकर यांनी सांगितले. त्यावरूनच या संपूर्ण प्रकाराबद्दल संशय निर्माण झाला आहे. गगन पगारे देखील पॉझिटिव्ह आहे किंवा नाही, याची खात्री देता येत नाही. कोरोना चाचणी करणारे आणि त्यांना सहकार्य करणार्यावर संशय येत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने चौकशी करण्यासाठी पालिकेने एक चौकशी समिती नेमले असल्याचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!