मुंबई : त्रिपुरामध्ये काही प्रार्थनास्थळांची नासधूस करण्याच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव, नांदेड या भागांमध्ये बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमरावतीमध्ये या बंददरम्यान काही हिंसक घटना घडल्यानंतर त्यावर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात बोलत असतांना पाटील म्हणाले की,’याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती पण हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर होईल असे वाटले नव्हते. बांग्लादेशमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी त्रिपुरामध्ये आंदोलने केली. तिथे घटलेल्या घटनांवरुन आणि घोषणांवरुन निषेध करण्यासाठी एका संघटनेने महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. त्यामधून दगडफेक आणि इतर घटना झाल्या. ते शांत झाल्याच्या नंतर एका राजकीय पक्षाच्यावतीने बंदची हाक देण्यात आली होती आणि तिथे सुद्धा तसाच प्रकार घडला. ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी आहे. पण अशा घटना घडत आहेत की घडवल्या जात आहेत यासंदर्भात आम्ही चौकशी करत आहोत. चौकशीचा निष्कर्ष आल्यानंतर कारवाई केली जाईल,’ असेही ते म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’रझा अकादमीचा संदर्भात मी पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामध्ये जर त्यांची भूमिका दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. तसेच यामध्ये कुठला राजकीय पक्ष आणि कुठला नेता आहे हे जास्त महत्त्वाचे नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.’
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

