सोलापूर: अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यभरात राजकारण ढवळून निघत आहे. त्यामुळे आता हे संप संपवण्याच्या तयारीत एसटी महामंडळ व राज्य सरकार असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळतो आहे, त्यावर समाधानी राहावे. त्यांचा पगार देण्यासाठी राज्यसरकारने एसटी महामंडळाला आत्तापर्यंत २ हजार कोटी रुपये दिले आहेत आणि यापुढेही राज्यसरकार एसटी महामंडळाला पैसे देत राहील, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. या व्यक्तव्यवरून एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या पगारात तुम्ही तुमचं घर चालवून दाखवा, असं खुलं आवाहन केलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एका कर्मचाऱ्याने संताप व्यक्त केलाय. तुम्ही म्हणता, या पगारात करा, मी माझ्या २५ हजार रुपये पगार संजाय राऊत यांना देतो, त्यांनी स्वतःचं घर चालवून दाखवावं, माझे दुसरे काही म्हणणे नाही, असे त्या कर्मचाऱ्याने आव्हान केले आहे. संजय राऊत यांनी भावना दुखवणारी वक्तव्ये करू नयेत, असे बोलून आणखी आत्महत्या वाढवू नका. राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनांची तरी बाळगावी, असे म्हणत त्याने संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवारांचं दिल्लीत कोणी नाव पण घेत नाही; नारायण राणेंची टीका
- कर्णधार रोहित शर्माकडे तरुणांसाठी भरपूर वेळ असतो : दिनेश कार्तिक
- ‘कंगना हलकट बाई, तिने सत्ताधाऱ्यांचे पाय चाटून पद्मश्री घेतलाय’
- बहुप्रतिक्षीत ‘डार्लिंग’ या सिनेमातील ‘मनाचं पाखरू…’ गाण्याने तरूणाईला घातली भुरळ
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

