नवी-दिल्ली : ‘दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट’ आयोजित ‘सिडनी डायलॉग’ या तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आभासी उपस्थितीने आणि भाषणाने झाली.
यावेळी बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,’क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला पाहिजे, परस्पर सहकार्य केले पाहिजे, या गोष्टींचा गैरवापर होणार नाही, या आभासी चलनामुळे युवा पिढी बिघडणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे.’ तसेच डिजिटल क्रांतीमुळे आपण एक मोठं स्थित्यंतर अनुभवत आहोत. यामुळे राजकारण, अर्थव्यवस्था, समाज याची पुर्नमांडणी होत आहे. या बदलत्या परिस्थितीमुळे सार्वभौमत्व, शासन, नैतिकता, कायदा, हक्क, सुरक्षा यावर नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत, असेही ते म्हणाले.
Addressing The Sydney Dialogue. https://t.co/AYQ5xajhRD
— Narendra Modi (@narendramodi) November 18, 2021
दरम्यान, देशात आम्ही ६ लाख गावे ही फायबर केबलने जोडत आहोत. आरोग्य सेतू आणि कोविन अँप यांचा वापर करत आम्ही ११० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस दिली. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा शासन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात करत आहोत. आरोग्यापासून राष्ट्रीय सुरक्षेपर्यंत तसं उद्योग आणि सेवा क्षेत्रात आमुलाग्र बदल हे डिजिटल क्रांतीमुळे होत आहेत, केले जात आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता, भविष्यातील दूरसंचार क्षेत्र जसं की 5G आणि 6G या सर्वांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे,असेही यावेळी मोदींनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल


