मुंबई : हातातली पैशांची पर्स हिसकावून घेतल अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांना मुंबईत भर रस्त्यात लुटले आहे. या पर्समध्ये मोबाईल आणि इतर काही महत्त्वाचे सामान होते. ६५ वर्षीय सलमा यांनी मुंबई पोलिसांनी या संदर्भात एफआयआर दाखल करुन घेतला नसल्याचा आरोप केला आहे.
शनिवारी सलमा त्यांच्या वर्सोवा येथील बंगल्यापासून एका दुकानात रिक्षाने जात होत्या. त्याच वेळी दोन चोर बाइकवरुन आले आणि त्यांनी सलमा यांच्या हातातील पर्स चोरुन ते फरार झाले. सलमा लगेच वर्सोवा पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचल्या. पण पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा सलमा यांनी केला आहे. ‘माझ्या पर्समध्ये दोन मोबाईल, रोख रक्कम आणि इतक काही महत्त्वाचे सामान होते. पर्स चोरीला गेल्यानंतर मी लगेच वर्सोवा पोलिसात ठाण्यात पोहोचले. तेथील अधिकाऱ्याने एफआयआर दाखल करण्यासाठी तिन तास लागतील असे सांगितले. माझी तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली’ अशी माहिती सलमा यांनी माध्यमांना दिली आहे. पुढे त्या म्हणाल्या, ‘आमच्या भागामध्ये हे पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. चोरांकडे महागडी बाइक आहे आणि जेथे माझी पर्स चोरली तेथे शेजारी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.’
एफआयआर दाखल करण्यास उशिर का झाला असे विचारताच पोलिसांनी ‘आम्ही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी एफआयआर दाखल करतो. पण अभिनेत्रीकडे वेळ नव्हता. त्या नंतर येतील असे सांगून निघून गेल्या होत्या. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्या जेव्हा पोलीस ठाण्यात येतील तेव्हा आम्ही एफआयआर दाखल करु’ असे उत्तर दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल- शरद पवार
- गिरगाव न्यायालयाने बजावलेले समन्स रद्द करा- राहुल गांधी
- क्रांती रेडकरने शेअर केले समीर वानखेडेंचे जन्म प्रमाणपत्र
- ‘त्याला माझ्या कमतरता माहीत आहेत’, रोहितने केले न्यूझीलंडच्या ‘या’ खेळाडूचे कौतुक
- वानखेडेप्रकरणी नवाब मलिक यांचा उच्च न्यायालयात अर्ज दाखल


