नागपूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना संसर्गाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. यामुळे राज्यातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत असून संसर्गाला आळा घालण्यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच, येत्या काळात काही दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील स्थिती पाहता केंद्र सरकारने काल रेमडेसीवीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनची मागणी वाढली असून साठेबाजी करून चढ्या दराने हे इंजेक्शन विकण्याचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. राज्यात रुग्णांसाठी रेमडेसीवीर इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठ्या रांगेत उभे राहून अधिक दराने हे इंजेक्शन विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे आता केंद्राच्या निर्णयानंतर दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबई, पुण्यापाठोपाठ नागपूरमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. यामुळे राज्यासह नागपूरमध्ये इंजेक्शन्सचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन/ ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
श्री गडकरीजी यांच्या विनंतीवरून 'मायलन इंडीया'ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत आणि लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेडेसिवीर' इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यांत मोठी कंपनी आहे.
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) April 12, 2021
गडकरींच्या विनंतीवरून ‘मायलन इंडीया’ने तात्काळ चार हजार इंजेक्शन नागपूरला पोहोचते केले आहेत आणि लवकरच दुसरी खेप पाठवण्याचे आश्वासनही दिले आहे. मायलन इंडिया ही ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शन उत्पादन करणारी भारतातील सगळ्यांत मोठी कंपनी आहे.
यापूर्वी गडकरी यांनी ‘सन फार्मा’चे मालक सिंघवी यांच्याशी बोलणे केले होते. ‘सन फार्मा’मार्फत गेल्या दोन दिवसात तीन हजार डोसचा पुरवठा नागपुरात झाला आहे आणि उर्वरित डोसेज लवकरच पोहोचवण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती नितीन गडकरींच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कानडी भूमीत मराठी तरुणाचा शड्डू; संजय राऊत जाणार कर्नाटकात प्रचाराला
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांना समन्स, १४ एप्रिलला होणार सीबीआय चौकशी
- सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण; फडणवीसांच्या विधानाने खळबळ
- ‘ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी’, फडणवीसांच्या सत्तापालटाच्या विधानाचा मलिकांनी घेतला समाचार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

