मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंढरपुर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत भाषण करताना पुन्हा एकदा सत्तापालटावर सूचक विधान केलं आहे.
‘केवळ एका मतदारसंघाची निवडणूक आहे, याने काय फरक पडणार आहे ? याने काय सरकार बदलतंय का ? असे सवाल केले जात आहेत. सरकार कधी बदलायच ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण. तुम्ही समाधान आवताडेंना विजयी करा, तिकडे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’ असं विधान फडणवीसांनी केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी समाचार घेतला आहे. ‘गेले पंधरा महिने भाजप महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र मी त्यांना सांगू इच्छितो, ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल,’ असं भाष्य नवाब मलिक यांनी केलं असून अशक्य असलेल्या गोष्टींसाठी वापरल्या जाणाऱ्या हिंदी वाकप्रचाराचा (ना नौ मन तेल होगा ना राधा नाचेगी) वापर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- कानडी भूमीत मराठी तरुणाचा शड्डू; संजय राऊत जाणार कर्नाटकात प्रचाराला
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- मोठी बातमी : अनिल देशमुख यांना समन्स, १४ एप्रिलला होणार सीबीआय चौकशी
- सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण; फडणवीसांच्या विधानाने खळबळ
- भाजपच्या लसोत्सवात अपुऱ्या लसींचा अडथळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

