मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी हायकोर्टाने सीबीआयला १५ दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे.
सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांच्या स्वीय सहायकांची रविवारी चौकशी करण्यात आली होती.
याआधी अँटिलिया स्फोटक प्रकरणी एनआयएच्या ताब्यात असलेले सचिन वाझे, महेश शेट्टी बार मालकासह मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह, तक्रारदार अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. सीबीआय अधिकारी काल (11 एप्रिल) सचिन वाझे यांच्या दोन चालकांना DRDO मध्ये घेऊन आले होते. तर अनिल देशमुख यांचे खासगी सचिव एस कुंदन आणि संजीव पालांडे यांना बोलावण्यात आलं होतं. या सगळ्यांची 8 ते 10 तास चौकशी करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- कानडी भूमीत मराठी तरुणाचा शड्डू; संजय राऊत जाणार कर्नाटकात प्रचाराला
- ई-कॉमर्स व्यापारासह सरसकट लॉकडाऊन करा, अन्यथा…पुण्यातील व्यापाऱ्यांचा प्रशासनाला इशारा
- रमजान साजरा करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट द्या : राष्ट्रवादी
- सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण; फडणवीसांच्या विधानाने खळबळ
- भाजपच्या लसोत्सवात अपुऱ्या लसींचा अडथळा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

