🕒 1 min read
मुंबई: भाजपचे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. या एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं. यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. असे गौरोद्गार काढले आहेत, भाजपचे नेते निलेश राणे यांनी. त्यांनी ट्वीट करत किरीट सोमय्या यांचे कौतुक करत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी सतत ठाकरे सरकारवर निशाना साधला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्टाचार आरोप असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले गेले, यावरूनच किरीट सोमय्या यांनी सतत याबाबतचे पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला. तसेच किरीट सोमय्या यांनी अनेक दावेही केले. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे सरकार बऱ्याचदा अडचणीतही आले. त्यांचेच कौतुक भाजप नेते निलेश राणे यांनी केले आहे.
स. @KiritSomaiya जी यांनी महाविकास आघाडीची इतकी वाट लावली की राज्य सरकारला त्यावर उत्तर मिळत नाहीये. एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. किरीटजी आपण लढत असेच राहावे…
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 20, 2021
नितेश राणे यांनी म्हटले आहे की,’एका व्यक्तीने तीन चोरांचं सरकार हलवून टाकलं यावरून किरीट सोमय्या यांची उंची कळते आणि ठाकरे सरकार ची लायकी कळते. किरीटजी आपण लढत असेच राहावे.’ असे विधान निलेश राणे यांनी ट्वीट करत केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ही भूमी छत्रपती शिवरायांची आहे, मुघलांची नाही; सोमय्यांवरील कारवाईवरून भाजप आक्रमक
- पुणेकरांना बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत कोरोनामध्ये वाढ नाही – मुरलीधर मोहोळ
- अफगाणिस्तानमध्ये भारतीय गुंतवणूक सुरु राहणार?; गडकरींनी दिले उत्तर
- काँग्रेसचे धक्कातंत्र; चरणजीत सिंग चन्नी होणार पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
- महामारीची भैरवी झाली; आता नाटकाच्या नांदीसाठी कान आतूर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
